ध्यान मंदिर

साईबन मध्ये ध्यान मंदिर

ध्यान मंदिर

शांतपणे बसून ध्यान करण्यासाठी इको फे्रंडली ध्यानमंदिराची उभारणी केलेली आहे. या ध्यानमंदिरात आवश्यक ती प्रकाश योजना, ध्यानास योग्य असलेली व संगीताची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. सुखी, आनंदी, निरोगी, समृध्द जीवनासाठी


* राजयोगा मेडिटेशन *

कोण्या एकेकाळी आपल्या भारतातून सोन्याचा धूर निघत होता. सर्व आनंदी निरोगी होते, प्रेम हीच भाषा होती. सामाजिक समरसता उत्तम होती पण आता

आता हे चित्र पालटलं आहे उलट झालं आहे. आजच्या जमान्यात लहान मुलांपासून मोठयांपर्यंत सर्वानाच वेगवेगळी टेन्शन्स आहेत, त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे, कुटुंबात समज गैरसमज वाढत आहेत, व्यवसाय-धंदयात म्हणावे तेवढे यश मिळत नाही, राजकीय, सामाजिक वातावरण, पर्यावरणाचे वातावरण दुषित झालेले दिसत आहे. माणसाने स्वत:ची आत्मशक्ती क्षीण केली आहे. अनेक संकट व प्रश्न आज आपल्या समोर आहेत.

या प्रश्नांना उत्तर हवे असेल आपले जीवन परत सुखी, आनंदी करायचे असेल तर सहभागी व्हा राजयोगा मेडिटेशनमध्ये !

* हा कोर्स रोज 1 तास 7 दिवस असतो * हा पूर्णत: विनामूल्य आहे.