मेडिटेशन टेकडी

साईबन मध्ये मेडीटेशन टेकडी

राजस्थानी मेडीटेशन टेकडी

ध्यानधारणा-मेडिटेशन ची महत्वपूर्ण देणगी भारताने जगाला दिली आहे. आज अवघ्या जगात योगा-ध्यानधारणेचा नांवलौकिक झाला आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या माध्यमातून संपूर्ण जगात योगा-मेडिटेशन दिवस साजरा झाला. योगा-मेडिटेशन ही एक दिवस करण्याची बाब नाही तर योगा-मेडिटेशन ही एक दैनंदिन जीवनपध्दती बनली पाहिजे. म्हणूनच आता शाळा महाविद्यालयातुन रोज काही मिनीट का होईना मेडिटेशन केले पाहिजे अशा सुचनाही वरिष्ठांकडून जारी करण्यात आल्या आहेत. विद्याथ्यार्ंची स्मरणशक्ती, आकलनशक्ती, ज्ञानग्रहणशक्ती, मनाची एकाग्रता यामुळे वाढणार आहे. सर्वच वयोगटातील व्यक्तींनी मेडिटेशन केले पाहिजे. निरोगी आरोग्यसंपन्न, सुखी, आनंदी, यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली म्हणजे मेडिटेशन होय. आजकालच्या दगदगीच्या धावपळीच्या या जीवनामध्ये काही क्षण का होईना शांततेचे, समाधानाचे मिळाले. आनंदाचे, प्रेमाचे मिळाले तर ते कोणाला नको आहेत? सर्वांनाच ते हवे आहेत यासाठीच साईबन मेडिटेशन टेकडीची निर्मिती करण्यात आली आहे.

टेकडीच्या ठिकाणी वैश्विक ऊर्जाशक्ती (कॉस्मीक एनर्जी) भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे ध्यान अवस्थेत लवकर जाण्यास आणि दीर्घकाळ त्या शांत अवस्थेत राहण्यास मदत होते. साईबनच्या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाशी एकरूप होतांना मन आनंदी व चित्त प्रसन्न होते. सदर टेकडी वरून सूर्योदय व सूर्यास्त या दोन्ही नयनरम्य सौंदर्याचा लाभ घेता येतो.मनामध्ये असलेली अगाध शक्ती जागृत करण्यास मदत होते. गहन शांतीची अनुभूती होते. आपले आत्मिक बल वाढविण्याचे महत्वपूर्ण कार्य मेडिटेशनने होत असते. मेडिटेशनची विधी

  • मेडिटेशन टेकडीच्या टप्यावर बसावे, मांडी घालता आली नाही तरी चालेल पण मान पाठ ताठ असणे महत्वाचे आहे. बाकीचे शरीर रिलॅक्स असावे.
  • मेडिटेशन करतांना शरीर स्थिर (स्टेबल) असणे महत्वाचे आहे. इतर कुठल्याही हालचाली नसाव्यात, शांत-स्थिर बसावे.
  • डोळे अलगद मिटावेत.
  • आपल्या स्वत:च्या श्वासाकडे लक्ष दयावे (ते आखुड किंवा लांब न करता कुठल्याही प्रकारचा प्राणायम न करता) नैसर्गिक श्वास जसा असेल तसा अनुभव करावा.
  • रेकॉर्ड वर लागलेल्या (गीताशी/ कॉमेंट्रीशी/ म्युझीकशी/ ओंकाराशी) एकरूप व्हावे.
  • मनोमन शांतीच्या अनुभुतीत स्थित व्हावे.
  • हळू हळू डोळे उघडावे.

* अनेक प्रकारचे मेडिटेशन समाजात प्रचलीत आहेत. सर्वांनी आपापल्या पध्दतीने मेडिटेशन केले तरी चालेल. मेडिटेशनचे फायदे

  • तणावमुक्त जीवन
  • शांत झोप
  • जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन
  • आनंदी समृध्द जीवनाकडे वाटचाल
  • मधूर सुंदर नाते संबंध
  • वर्तमानकाळात जगण्याची सवय
  • जीवनाचे ध्येय गाठण्यास मदत
  • निरोगी-आरोग्यसंपन्न जीवनाकडे वाटचाल.
  • दिव्य-शुध्द विचारांची सोबत, तसेच कला गुणांमध्ये वृध्दी
  • मन शांत- शक्तीशाली, आत्मिकशक्तीत वाढ
  • मनाची एकाग्रता, आकलनशक्ती, ग्रहणशक्तीत वाढ
  • मनाची शांतता वाढल्यामुळे मन अधिक शक्तीशाली झाल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, वाढता रक्तदाब वगैरे शारीरिक व मानसिक आजारापासून दूर
  • मनाची एकाग्रता स्मरणशक्ती वाढल्यामुळे अभ्यासात मदत. त्यामुळे निकालात सुधारणा. तसेच व्यवसाय/ नौकरीत प्रगती
  • सुखी, आनंदी, निरोगी आरोग्यसंपन्न यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली म्हणजे मेडिटेशन होय.
  • मेडिटेशनने जे दिव्य, सकारात्मक स्पंदने/प्रकंपने निर्माण होतात त्याचा सकारात्मक परिणाम स्वत:च्या शरीर-मनावर तसेच आजूबाजूच्या वनस्पती-वातावरणावर आणि सानिध्यातील सर्व सजीव-निर्जीव बाबीवरही होत असतो. याच आधारावर साईबनमध्ये शाश्वत यौगिक शेती ही केली जाते. अधिक माहितीसाठी पोस्टर प्रदर्शनी पहावी ही विनंती.