हुरडा पार्टी

साईबन मध्ये हुरडा पार्टी

हुरडा पार्टी

‘साईबन’ हा महाराष्ट्रभर लोकप्रिय झाला तो नोव्हेंबर पासून ३ महिने चालाणार्याच हुरडा महोत्सवामुळे. शेतात बसून ज्वारीचे कोवळे कणीस गोवर्या त भाजून त्याचे गोड गोड दाणे, चटणी, रेवडी, गुडीशेव बरोबर खाणे व नंतर पिठलं भाकरी, वांग्याचे भरीत, मठ्ठा वगैरेची मज्जा व गप्पा गाणी, नृत्य, खेळ ह्याचा आनंदच वेगळा ! त्याच प्रमाणे साईबनच्या तलावा शेजारी पहाटे व सायंकाळी सूर्योदय व सूर्यास्ता बरोबरच पक्षी निरीक्षण हा ही अलौकिक आनंद आहे.