साईबन मध्ये मानकन्हैया पर्यावरण केंद्र

साईबन मध्ये मानकन्हैया कृषी व पर्यावरण केंद्र

मानकन्हैया कृषी व पर्यावरण केंद्र

अहमदनगर शहरातील डॉ. प्रकाश कांकरीया व डॉ. सुधा कांकरीया जगप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आहेत. अनेकांना दृष्टी देणार्या कांकरीया दांम्पत्यानी खडकाळ माळरानावर हिरवी सृष्टी उभारली आहे. हिरव्या सृष्टीला साईबन कृषी पर्यटन केंद्र असे नाव देण्यात आले आहे. पॉली हाऊस , माती विना शेती, स्ट्रॉबेरी लागवड सारखे विविध प्रयोग साईबनात पहायला मिळतात. शेतीचा कोणताच अनुभव नसताना, जागतिक दर्जाची शेती ङ्गुलवणार्या कांकरीया दांम्पत्याने पारंपारिक शेतीला अध्यात्माची जोड दिली आहे. शेतीविकासाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कांकरीया दांम्पत्याला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व स्वर्गीय मोहन धारीयांचे मार्गदर्शन लाभले आहे.

निसर्गावर अत्याचार करणार्यांचा बदला निसर्गच घेत असतो. महाकाय डायनासोरांनी पृथ्वीवर उन्माद मांडला होता. कालांतराने पृथ्वीवरुन डायनासोरांचे अस्तित्वच गायब झाले. सध्या पृथ्वीवर मानवाने उन्माद मांडला आहे. मानव नावाचा प्राणी निसर्गाचे ओरबाडे काढण्यात सर्वात पुढे आहे. निसर्गाचे असेच ओरबाडे काढले तर, भविष्यात मानव सुद्धा पृथ्वीवरुन गायब होवू शकतो. पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकवण्यासाठी निसर्ग संवर्धन हाच एकमेव उपाय आहे. वनीकरणाच्या चळवळीतून निसर्गाचे खर्या अर्थाने संवर्धन होण्यास सुरवात झाली होती. मध्यंतरी वनीकरणाच्या चळवळीला ब‘ेक लागला होता. परिणामी दुष्काळासार‘या आसमानी संकटांचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतो आहे.

पाणी व निसर्गाकडे चित्रपट क्षेत्रातील अमीर खान व सयाजी शिंदे सार‘या कलाकारांनी डोळस दृष्टीने पहायला सुरवात केली. त्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या चळवळीला उभारी मिळाली. कलाकारांच्या सामाजिक चळवळीच्या सहभागाला सातत्याने प्रसिद्धी मिळत असते. निवडक मंडळी प्रसिद्धीसाठी सामाजिक उपक‘मांचाही अधार घेत असतात. निसर्गावर अस्सल प्रेम करणारी व्यक्तीमत्व मात्र प्रसिद्धीपासून दुरच राहणे पसंत करतात. प्रसिद्धी पासून चार हात लांब असणार्या डॉ. प्रकाश कांकरीया व डॉ. सुधा कांकरीया यांनी निसर्ग संवर्धन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. जगप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ असलेल्या कांकरीया दांम्पत्याची निसर्ग कथा अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

अहमदनगर शहराच्या नजीकच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अरक्षीत केलेले क्षेत्र आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मोक्याचे खडकाळ माळरान औद्योगिक विकास महामंडळासाठी अरक्षीत केले जाते. याच खडकाळ माळरानावार कांकरीया दांम्पत्याने साईबन नावाचे जागतिक दर्जाचे कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. वयाची साठी पार केलेल्या कांकरीया दांम्पत्यानी साईबन कृषी पर्यटन केंद्रात अधुनिक शेती तंत्राला प्राधान्य दिले आहे. औषधी वनस्पती संग‘ाहलय, पॉली हाऊस , माती विना शेती व ङ्गळबाग लागवडीला अध्यात्माची जोड देण्यात कांकरीया दांम्पत्याला यश आले आहे. निसर्गाला आपलेसे करुन अहमदनगरवासियांना हिरवी दृष्टी देणार्या कांकरीया दांम्पत्याची साईबनाची कथा जगण्याला नवे आयाम देवून जाते. एकूण सत्तर एकरावर पसरलेल्या साईबनाचा ङ्गेरङ्गटका मारताना जरा ही थकवा येत नाही. साईबनात शिवार ङ्गेरी करताना, आपण नक्कीच वेगळ्या विश्वात असल्याची अनुभुती येते. साईबनाची शाब्दीक सङ्गर नक्कीच आपल्याला वेगळ्या विश्वात घेवून जाईल यात शंका नाही.